Home ठळक बातम्या युवासेनेच्या महाराष्ट्र सचिवपदी दिपेश म्हात्रे यांची नियुक्ती

युवासेनेच्या महाराष्ट्र सचिवपदी दिपेश म्हात्रे यांची नियुक्ती

 

डोंबिवली दि. १४ मे :
कल्याण डोंबिवली महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती दिपेश म्हात्रे यांची युवासेनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात टेंभी नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रक काढून त्याद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू आणि युवा लोक प्रतिनिधी म्हणून दिपेश म्हात्रे यांची ओळख आहे. नगरसेवक, स्थायी समिती सभापतीपदीसह युवासेनेचे काम करताना त्यांनी आपल्या कार्यशैलीची छाप पाडली आहे. या कामाची दखल घेत त्यांना यापूर्वीच युवासेनेमध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता युवासेनेमध्ये थेट महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या जबाबदारीला आपण पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान युवासेनेच्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भासह कोकण विभागातील सचिव पदांवरही विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा