Home ठळक बातम्या नरेंद्र मोदींमुळे तुमचे अस्तित्व, नाही तर तुम्हाला कोण ओळखतं – राज ठाकरे...

नरेंद्र मोदींमुळे तुमचे अस्तित्व, नाही तर तुम्हाला कोण ओळखतं – राज ठाकरे यांची बोचरी टिका

कल्याणमध्ये घेतली पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक

कल्याण दि. १४ मे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच तुमचं अस्तित्व आहे. नाही तर तुम्हाला खाली कोण ओळखतं अशा शब्दांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला. राज ठाकरे सध्या पक्ष बांधणीनिमित्त ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. (Raj Thackeray reaction over Karnataka polls result)

पंतप्रधान मोदी मान्य करतात तर इतरांना काय अडचण…

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा झाला हे स्पष्ट आहे. विरोधक असले तरीही त्यांचा विजय आपण मान्य केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर ते मान्य करत असतील तर मग पक्षातील इतर नेत्यांना त्यात काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी कोणत्याही भाजप नेत्यांचे नाव न घेता उपस्थित केला.

छोट्या व्यक्तीवर आपल्याला जास्त काहीही बोलायचे नाही…

आपल्या पराभवातून जर का बोध घ्यायचा नसेल तर मग बसा तसेच. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच ज्यांचे अस्तित्व असून त्यांना खाली कोण ओळखतं का अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला. तर भाजप नेते आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांचे नाव न घेता ते म्हणाले की निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणाऱ्या व्यक्तींकडून अशी वक्तव्य केली जातात. त्यांच्यासारख्या छोट्या व्यक्तीवर आपल्याला जास्त काहीही बोलायचे नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कल्याणात कोणतीही गटबाजी नाही…

दरम्यान कल्याण पश्चिम मनसेमधील गटबाजीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता इकडे केवळ गट आहे बाकी काहीही नसल्याचे ते म्हणाले. तसेच मतभेद असू शकतील मात्र इकडे कोणतीही गटबाजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा