Home ठळक बातम्या कल्याणमध्ये गोविंदा पथकांना सुरक्षा विमा प्रमाणपत्र वाटप

कल्याणमध्ये गोविंदा पथकांना सुरक्षा विमा प्रमाणपत्र वाटप

आमदार गणपत गायकवाड यांचा उपक्रम

कल्याण दि.4 सप्टेंबर :
दहीहंडी खेळताना, सराव करताना झालेल्या अपघातानंतर येणारा वैद्यकीय खर्च अनेक गोविंदांना परवडणारा नसतो. या पार्श्वभूमीवर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्यात आले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवली जात असून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून या सुरक्षा विमा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवात आणि त्याच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातामध्ये अनेक गोविंदा कायमचे जायबंदी झाले आहेत. तर हे अपघात काहींच्या जीवावर बेतले आहेत. या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांचे विमा संरक्षणाची मागणी पुढे आल्यानंतर आता त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील तब्बल 40 गोविंदा मंडळाना यावेळी मोफत विमा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्याला समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, गीता झगडे, विनोद झगडे, निरंजन आहेर, मिथुन सरदळ, राजेश सोनावडेकर, जय जवान गोविंदाचे सचिव विजय निकम तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, नगरसेवक अभिमन्यु गायकवाड, मंडळ अध्यक्ष संजय मोरे आणि सर्व गोविंदा मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा