Home ठळक बातम्या आधी पर्यायी रस्ते करा; अन्यथा कल्याण शिळ रोडवरील मेट्रोचे काम बंद पाडू...

आधी पर्यायी रस्ते करा; अन्यथा कल्याण शिळ रोडवरील मेट्रोचे काम बंद पाडू – मनसे आमदार राजू पाटील

कल्याण ग्रामीणमधील 27 गावांची समस्या लवकर सुटणार

डोंबिवली दि.13 जून :
कल्याण शिळ रस्त्यावर सुरु असलेल्या कल्याण तळोेजा मेट्रोच्या कामामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि वाहन चालकांना नाहक त्रास होतोय. या कामाला आपला विराेध नाही. परंतू आधी पर्याची रस्ते करा, नंतर हे काम सुरु करा. तसे न केल्यास 7 दिवसात रास्ता रोको करण्याचा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

पर्यायी रस्ते नसल्यानेच वाहतूक कोंडी…
मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, कल्याण तळोजा मेट्रो आली. त्याचे काम सुरु केले आहे. हे काम सूरु करण्यापूर्वी कल्याण शीळ रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करा अशी आमची मागणी आहे. हे पर्याची रस्ते तयार नसल्याने आज शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात रुग्णवाहिका अडकून पडतात.

अन्यथा आम्ही रास्तारोको करणार…
कल्याण – तळोजा मेट्रोचे तळोजापासून सुरु करायला हवे होते. ते होईपर्यंत कल्याण शिळ मार्गावरील पर्याची रस्ते तयार करायला हवेत. तसे केले नाही तर आम्ही रास्ता रोको करून कल्याण शिळ परिसरात सुरू असणारे मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

साधे फेरीवाले हटवू शकत नाही कंपन्या काय हटवणार ?…
डोंबिवलीतील इंडो अमाईन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवरून आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेताेड टिका केली आहे. हे साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत. मग कंपन्या हटवू शकतील की नाही याबाबत मी साशंक असल्याची प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

कल्याण ग्रामीणमधील 27 गावांची समस्या लवकर सुटणार…

डोंबिवलीच्या पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने पाणी आणि रस्ते समस्यावर आमदार पाटील यांची बैठक बोलाविली होती. या समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढू असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा