Home कोरोना परप्रांतीयांना चाचणी आणि लसीकरणाशिवाय ठाणे जिल्ह्यात प्रवेश नको – आमदार राजू पाटील

परप्रांतीयांना चाचणी आणि लसीकरणाशिवाय ठाणे जिल्ह्यात प्रवेश नको – आमदार राजू पाटील

 

कल्याण दि.27 एप्रिल :
ठाणे जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करून इकडे येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याना थेट प्रवेश देण्यात येऊ नये. या सर्वांची कोरोना चाचणी आणि जमल्यास लसीकरण, नोंद करूनच ठाणे जिल्ह्यात प्रवेश देण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी या मागणीसह अनेक मुद्दे मांडले. (do-not-gave-entry-in-thane-district-without-vivid-testing-and-vaccination-demands-mla-raju-patil)

कल्याण डोंबिवलीच्या रुग्णालयातील रेमडीसीविर इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड, ऍम्ब्युलन्स, लसीकरण आदी महत्वाचे मुद्दे यावेळी त्यांनी उपस्थित केले. तसेच आढावा बैठक घेण्याच्या आपल्या मागणीला मान देऊन ही बैठक आयोजित केल्याबद्दलही आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

आमदार राजू पाटील यांनी बैठकीत मांडले हे मुद्दे…

1. रेमेडीसिवर इंजेक्शनचा महानगरपालिकेने रिझर्व कोटा ठेवावा. ज्यांना एमर्जन्सी मध्ये पाहिजे असेल तर रिप्लेसमेंट किंवा खरेदी करू शकतील.

2. महानगरपालिकेने तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये साधे बेड कमी करून व्हेंटिलेटर बेड तातडीने तयार करावेत. जेणेकरून नवीन कोविड सेंटर उभे करण्याआधीच जास्तीचे व्हेंटिलेटर बेड तयार होतील.

3. गेल्यावर्षी 2 ॲम्बुलन्ससाठी आमदार निधी दिला. परंतु अद्यापही अंबुलन्स मिळालेल्या नाहीत. कोविडकरता दिलेल्या आमदारनिधीचा विनियोग जलद करण्यात यावा.

4. १ मे पासून सुरु होणारे लसीकरण केंद्र मोठ्या प्रमाणात चालू करावे व जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावे. तसेच आता बाहेरून येणारे लोंढ्याना थेट प्रवेश न देता ठाणे जिल्ह्यातील सर्व सीमा सील करावी. त्यांची कोरोना चाचणी,जमल्यास लसीकरण आणि नोंद करूनच प्रवेश द्यावा.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा