Home कोरोना प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करा – रवी पाटील यांची मागणी

प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करा – रवी पाटील यांची मागणी

कल्याण दि.27 एप्रिल :
सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन देत ही मागणी केली आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. तर दुसरीकडे सध्या अस्तित्वात असणाऱ्या लसीकरण केंद्रांवरही नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत अस्तित्वात असणारी लसीकरण केंद्र अपुरी पडत आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागात किमान 500 जणांचे लसीकरण होईल या पद्धतीने नियोजन करण्याची गरज रवी पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळा, कॉलेज, हॉल आदी वास्तू पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागात लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी रवी पाटील यांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा