Home क्राइम वॉच 58 वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्येने हादरली डोंबिवली; मारेकऱ्यासह हत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध

58 वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्येने हादरली डोंबिवली; मारेकऱ्यासह हत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध

 

डोंबिवली दि.17 जानेवारी
घरात एकट्याच असणाऱ्या 58 वर्षीय वृद्ध महिलेच्या झालेल्या निर्घृण हत्येने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली. या हत्येमागचे नेमके कारण आणि कोणी ही हत्या कोणी केली याबाबत माहिती मिळू शकली नसून पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.

विजया बाविस्कर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून डोंबिवली पूर्वच्या टिळक नगर परिसरातील आनंद शिला इमारतीत त्यात राहत होत्या. याच परिसरात विजया यांच्या घराचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरु असल्याने त्या या इमारतीत भाड्याने राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. तसेच त्या घरी एकट्याच राहायच्या. सोमवारी सकाळी घरकाम करणारी महिला आली तेव्हा तिला घराला बाहेरुन कडी दिसली. या महिलेने कडी काढून घरात प्रवेश करताच तिला धक्काच बसला. विजया बाविस्कर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे सुरू केली. ही हत्या कोणी केली? आणि का केली? या दोन मुख्य प्रश्नांच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा