Home कोरोना जागरूक नागरिकामूळे कल्याणात कोवीड रुग्णाचे बिल झाले 50 हजारांनी कमी

जागरूक नागरिकामूळे कल्याणात कोवीड रुग्णाचे बिल झाले 50 हजारांनी कमी

कल्याण दि.6 एप्रिल :
कोवीड रुग्णाला शासकीय दरांपेक्षा जास्त दर आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णलायाला जागरूक नागरिकाने दाखवलेल्या हिसक्यानंतर या रुग्णालयाने तब्बल 50 हजार रुपयांनी बिल कमी केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

कल्याण पश्चिमेतील ओंकार रुग्णालयात एका 52 वर्षीय व्यक्तीला कोवीड उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देताना हॉस्पिटल प्रशासनाने तब्बल 1 लाख 48 हजारांचे बिल नातेवाईकांच्या हातात दिले. एवढे मोठे बिल बघून रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. याबाबत त्यांनी जागरूक नागरिक उल्हास जामदार यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. त्यावर उल्हास जामदार यांनीही या बिलाबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत बिलातील अनियमितता निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी सर्व बिलांची तपासणी केली असता त्यामध्ये शासकीय दरांपेक्षा अधिक रक्कम आकारण्यात आल्याचे दिसून आले. त्यावर महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने हॉस्पिटल प्रशासनाला ही रक्कम कमी करण्याचे निर्देश देत सुधारित बिल दिल्याची माहिती उल्हास जामदार यांनी दिली. यानंतर रुग्णाच्या बिलातून तब्बल 50 हजार रुपये कमी झाल्याने कुटुंबियांनीही सुटकेचा निःश्वास सोडत जामदार यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान कल्याण डोंबिवलीत कोवीड पेशंट वाढत असून कोवीड रुग्णांची आर्थिक लुबाडणूक थांबवण्यासाठी ऑडिटर्सची नियुक्ती केली असूनही असे प्रकार घडत असल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. तर महापालिका आयुक्तांनीही या प्रकरणात संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी कोवीड रुग्णाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा