Home कोरोना विवाह सोहळ्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल तर मॅरेज हॉलही केला सील

विवाह सोहळ्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल तर मॅरेज हॉलही केला सील

कल्याण दि.6 एप्रिल :
शासनाने दिलेल्या कोवीड निर्बंधांचे उल्लंघन करत आपल्या मुलीचा शाही विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी अखेर शिवसेना पदाधिकाऱ्यासह वर गुन्हा दाखल करण्यासह संबंधित मॅरेज हॉलही (ओपन लॉनही) सील करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेच्या काळा तलाव परिसरात गेल्या शनिवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनिल वायले यांच्या मुलीचा जंगी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी कोवीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महात्मा फुले चौक‍ पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांनी आयोजक सुनिल वायले, सुरेश म्हात्रे आणि मॅरेज लॉन्स व्यवस्थापक रमेश लक्ष्मण सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. तर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार हे दोन्ही लॉन्स प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांच्यामार्फत 30 एप्रिलपर्यंत सील करण्यात आल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

 

मागील लेखजागरूक नागरिकामूळे कल्याणात कोवीड रुग्णाचे बिल झाले 50 हजारांनी कमी
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 309 रुग्ण तर 811 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा