Home ठळक बातम्या कल्याणच्या कोळीवाड्याला कार्ल्याच्या एकवीरा देवी चैत्र पालखी सोहळ्याचा मान

कल्याणच्या कोळीवाड्याला कार्ल्याच्या एकवीरा देवी चैत्र पालखी सोहळ्याचा मान

लोणावळा दि.16.एप्रिल :
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आगरी – कोळी समाजाची कुलदेवी असणाऱ्या एकवीरा देवीचा चैत्र पालखी सोहळा अतिशय भक्तीभावपूर्ण वातावरण आणि उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे या चैत्र यात्रेतील पालखीचा मान यंदा कल्याणच्या कोळीवाड्याला मिळाला होता.

कालच म्हणजे सोमावरी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा एकवीरा देवीचा चैत्र पालखी सोहळा संपन्न झाला. यामध्ये कल्याणच्या कोळीवाड्याने काढलेल्या अतिशय दिमाखदार पालखीने भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. एकीकडे एकवीरा देवीचा जयघोष आणि दुसरीकडे गुलाल आणि फुलांची उधळण. अशा अतिशय भारावलेल्या वातावरणात कल्याण कोळीवाड्याच्या सदस्यांनी ही देवीची पालखी काढली. तर देवीच्या पालखीसाठी कल्याण कोळीवाड्यातर्फे विशेष अशी नंदीवर आरूढ झालेल्या भगवान शंकराची सुदंर अशी सजावट करण्यात आली होती. या देवीच्या पालखीमुळे संपूर्ण कार्ल्याचा डोंगर आई माऊलीच्या जयघोषात दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा