Home ठळक बातम्या या वर्षातील उच्चांक : कल्याण डोंबिवलीत तापमान “अब की बार 43 अंशापार...

या वर्षातील उच्चांक : कल्याण डोंबिवलीत तापमान “अब की बार 43 अंशापार “

सलग दुसऱ्या दिवशी पाऱ्याने ओलांडली चाळीशी

कल्याण डोंबिवली दि.16 एप्रिल :
कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात आज सलग दुसऱ्या दिवशी तापमानाने कहर केलेला पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवलीमध्ये आज तब्बल 43.1 अंश सेल्सिअस इतक्या मोठ्या तापमानाची नोंद झाली. जे या वर्षातील सर्वाधिक तापमान ठरले. (This year’s high: Kalyan Dombivli temperature “crosses 43 degrees Celsius”)

गेल्या वर्षीही याच कालावधीत अशाच प्रकारचे तापमान…
कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर परिसरात कालपासून सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत आहे. कालच्याप्रमाणे आजही एमएमआर रिजन असह्य उकड्यामध्ये होरपळून निघाला. इथल्या नागरिकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ उन्हाचे चटके आणि उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षीही याच कालावधीत अशाच प्रकारचे तापमान आणि त्याची वाढ नोंदविण्यात आली होती अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमान…
कल्याण डोंबिवली परिसरात काल 42.4 अंश सेल्सिअस इतक्या मोठ्या तापमानाची नोंद झाली होती. आज या तापमानाने त्याही पुढे जात कल्याणात तब्बल 43.1 आणि डोंबिवलीमध्ये 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमान नोंदवले गेल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनला दिली. जे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमान ठरले आहे असेही मोडक यांनी स्पष्ट केले.

तर सूर्यास्त होऊनही संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 38 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात येत आहे. विदर्भात ज्याप्रमाणे उन्हाळ्यात वातावरण असते त्याप्रकारे उत्तर कोकणातही तसेच तापमान अनुभवायला मिळत असल्याचे मोडक म्हणाले.

प्रमूख शहरांमध्ये नोंदवण्यात आलेले आजचे तापमान..

कल्याण 43.1सेल्सियस
डोंबिवली 43
मुंबई 39.7
विरार 41
मीरा रोड 41
मुलुंड 42.4
नवी मुंबई 42
ठाणे 42.7
कळवा 42.8
धसई 42.5
मुंब्रा – भिवंडी 43.2
बदलापूर 43
मुरबाड 43.7
कर्जत 44.4

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा