Home ठळक बातम्या ‘मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करा’, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांना...

‘मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करा’, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

कल्याण ग्रामीण विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

डोंबिवली दि.15 एप्रिल :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज डोंबिवलीत पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवदूत, बीएलए आणि कार्यकर्ते उपस्थित होते.(‘Work to increase voting percentage’, MP Dr. Instructions to Shrikant Shinde’s office bearers)

कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंतरी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी प्रमाणात विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवून यंदा विक्रमी मताधिक्यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करण्याच्या सूचनाही या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कसे काम करावे, याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हा संघटक लता पाटील, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुकाप्रमुख महेश पाटील, अर्जुन पाटील, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा