Home ठळक बातम्या ठाणे युथ लीग मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे युथ लीग मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली दि.14 सप्टेंबर :

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या ठाणे युथ लीग मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. डोंबिवलीच्या पलावा फुटबॉल ग्राउंडवर 13 , 15 आणि 17 अशा तीन वयोगटात नुकतीच ही स्पर्धा खेळवण्यात आली. तर या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय ज्युनिअर आणि सब ज्युनिअर मुलींच्या महाराष्ट्राच्या संघासाठी काही खेळाडूंची निवड करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातून मुलींचे 12 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. 13,15 आणि 17 वयोगटातील या मुलींच्या संघांचे तब्बल 36 सामने खेळवण्यात आले. ज्यामध्ये नवी मुंबईतील जोशूआ फुटबॉल अकादमी, ठाणे सीटी एफसी, रायन इंटरनॅशनल, फुटबॉल स्कूल इंडिया, सेक्रेड हार्ट फुटबॉल अकादमी, क्वीन्स युनायटेड फुटबॉल अकादमी, रोअर फुटबॉल अकादमी आदी संघांचा समावेश होता.

13 वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद रोअर फुटबॉल अकादमीने, 15 वर्षांखालील स्पर्धेचे ठाणे सीटी एफसी आणि 17 वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद फुटबॉल स्कूल ऑफ इंडियाच्या संघाने पटकावले.

तर बेस्ट गोल किपर म्हणून नेहा घोलप (एफ एस आय, नवी मुंबई) समायरा शर्मा (एफ एस आय, नवी मुंबई) आणि कियारा सराफ (ठाणे सीटी एफ सी) आणि बेस्ट प्लेअर म्हणून झोया खान (जोशूआ फुटबॉल अकादमी), सना पालन (ठाणे सीटी एफसी), श्रावणी सावंतला (रोअर एफसी) गौरवण्यात आले.
ठाणे फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष विजय पाटील, सचिव सुनिल पुजारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा खेळवण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा