Home ठळक बातम्या दोन दिवसांत खड्डे न भरल्यास अभियंता- ठेकेदारांवर कारवाई – केडीएमसी आयुक्तांचा आक्रमक...

दोन दिवसांत खड्डे न भरल्यास अभियंता- ठेकेदारांवर कारवाई – केडीएमसी आयुक्तांचा आक्रमक पवित्रा

 

कल्याण डोंबिवली दि.13 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याच्या कामावरून केडीएमसी प्रशासन चांगलेच आक्रमक झाले असून दोन दिवसांत खड्डे भरले न गेल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदारावर कारवाईचा इशारा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे. (If the potholes are not filled in two days, action will be taken against the engineers-contractors – KDMC commissioner’s aggressive attitude)

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून कल्याण डोंबिवलीतील खड्डे भरण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

उद्या आणि परवा हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा तर त्यानंतर मसुळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसाचा हा अंदाज विचारात घेता सर्व अभियंता आणि कंत्राटदारांना आपण पुढील दोन दिवसांत सर्व प्रभागातील खड्डे डांबराने बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच ज्या प्रभागातील खड्डे दोन दिवसांत डांबराने भरले गेले नाहीत तर त्याठिकाणी सुपरव्हिजन करणारे अभियंता आणि संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिला आहे. संबंधित कंत्राटदाराचे बिल न काढण्यासह दंडात्मक कारवाई तर संबंधित अभियंत्याची विभागीय चौकशी करून कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिला आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पीडब्ल्यूडीलाही पत्र पाठवून खड्डे भरण्याच्या कामात गती न आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा