Home ठळक बातम्या डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत आग लागून स्फोट

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत आग लागून स्फोट

डोंबिवली दि.23 मे :

भीषण स्फोटाने पुन्हा हादरली डोंबिवली ; एमआयडीसीतील केमिकल कंपनीत मोठा स्फोट

काही कामगार जखमी ;शेजारील इमारतींचे मोठे नुकसान

डोंबिवली दि.23 मे :
भीषण स्फोटाने पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी परिसर हादरून गेला आहे. येथील फेज 2 मध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीत आज दुपारी झालेल्या स्फोटात मोठे नुकसान झाले आहे. कंपनीतील रिॲक्टरमध्ये हा स्फोट झाला असून या स्फोटाचे नेमके कारण काही समजू शकले नाही.
डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मध्ये ही केमिकल कंपनी आहे. आज दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या स्फोटात 10 ते 15 जण जखमी झाल्याचे कळत असून त्यात काही कामगार आणि स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. या सर्वांना एम आय डी सी परिसरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या परिसरात असणाऱ्या इमारतींचे आणि काही घरांचेही या स्फोटात नुकासन झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या डोंबिवली एमआयडीसी परिसरात 2016 मध्येही प्रोबेस कंपनीत अशाच प्रकारचा भीषण स्फोट झाला होता. ज्यामध्ये 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आज झालेल्या स्फोटाने याच घटनेची पुन्हा एकदा आठवण झाली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा