Home कोरोना गुडन्यूज : कोवीड निर्बंधांमध्ये केडीएमसीचा लेव्हल 2 मध्ये समावेश

गुडन्यूज : कोवीड निर्बंधांमध्ये केडीएमसीचा लेव्हल 2 मध्ये समावेश

21 जूनपासून निर्बंध होणार शिथिल

कल्याण – डोंबिवली दि.18 जून :
कल्याण डोंबिवलीतील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत आनंदाची तसेच महत्वाची माहिती आहे. कोवीड रुग्णांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे अखेर केडीएमसीचा कोवीड निर्बंधांच्या लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे इथले निर्बंध आणखी शिथिल झाले असून येत्या 21 जूनपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत नविन आदेश जारी केले आहेत.

गेल्या 2 आठवड्यांपासून केडीएमसी क्षेत्रातील कोवीड रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. मात्र निर्बंध शिथिल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निकषांच्या बॉर्डरवर केडीएमसी येत असल्याने गेले 2 आठवडे लेव्हल 3 मध्ये समावेश झाला होता. मात्र 21 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यासाठी केडीएमसीने नविन शिथिल झालेले निर्बंध जारी करत लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता केडीएमसी क्षेत्रात येत्या 21 जून पासून नविन शिथिल झालेले निर्बंध लागू होणार असून ए 27 जूनपर्यंत लागू असणार आहेत.

नविन निर्बंध आहेत असे…

दुकाने आणि अत्यावश्यक सेवेतील आस्थापना नियमितपणे सुरू राहणार ( वैद्यकीय सेवा वगळून)

अत्यावश्यक सेवेत नसलेली कार्यालयेही नियमितपणे सुरू करता येणार

मॉल्स, थिएटर, (मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन) 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

रेस्टॉरंटही 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेसाठी खुली

सार्वजनिक।ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग नियमित सुरू

खासगी कार्यालये संपूर्ण खुली ठेवण्यास मान्यता

लग्नसमारंभ हॉलच्या 50 टक्के क्षमतेने किंवा जास्तीत जास्त 100 व्यक्तींना परवानगी

अंत्यविधीसाठी उपस्थितीचे कोणतेही बंधन नाही

जमावबंदी लागू असणार

आदी महत्वाचे निर्णय 21 जूनपासून 27 जूनपर्यंत लागू राहणार असल्याचे केडीएमसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

2 कॉमेंट्स

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा