Home ठळक बातम्या तपास यंत्रणांच्या धाडीची आगाऊ माहिती बाहेरील लोकांना कशी कळते ? राष्ट्रवादी प्रवक्ते...

तपास यंत्रणांच्या धाडीची आगाऊ माहिती बाहेरील लोकांना कशी कळते ? राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपास यांचा सवाल

 

कल्याण दि. 23 मार्च :
एखादा व्यक्ती जो त्या तपास यंत्रणेचा अधिकारी नाही, पीआरओ नाही की त्यांचा कर्मचारीही नसताना मग त्यांना या तपास यंत्रणांच्या रेडची माहिती कशी काय कळते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. तपासे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आज कल्याण रेल्वे यार्ड परिसरात होणाऱ्या प्रस्तावित रेल्वे यार्ड रिमोडेलिंगच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

महाआघाडीच्या संदर्भात तपास यंत्रणांचा सपाटा सूरू केलाय. आता हा स्वयंघोषित सपाटा आहे की राजकीय हेतूने प्रेरित आहे हे चर्चेचा विषय आहे. मात्र त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते भविष्यवाणी करतात. अमुक अमुक व्यक्तीवर रेड होणार, अमुक अमुक व्यक्तीची देवाण घेवाण आहे. ईडी, सीबीआय, अँटी करप्शन, पोलीस की एनआयए या सर्व सरकारी यंत्रणावर आपला 100 टक्के विश्वास असल्याचे तपासे म्हणाले.
तर तपास यंत्रणेचे काम आहे की आरोपीला कोर्टासमोर उभे करणे, आरोप खरे आहेत की खोटे हे कोर्ट सिद्ध करेल. परंतु एखाद्या तपास यंत्रणांच्या कारवाईची आगाऊ माहिती एखाद्याला कशी होते हा खरा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

तर महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून सरकारला, सरकारच्या नेत्यांना टारगेट करणे , सरकार कसे कोसळेल? अस्थिरता कशी माजेल? लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल? याच्यासंदर्भात भाजपचे अनेक नेते वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही तपासे यांनी यावेळी केला.
वास्तविक आता देशातील लोकं भोळी राहिलेली नाही, लोकांना यांच्यातून स्पष्ट चित्र दिसत आहे. पावसात शरद पवार भिजले पण निमोनिया त्यांना झाला असल्याचा टोलाही तपासे यांनी भाजपला लगावला.

“केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण सर्वांसाठी घातक असल्याचे मत…”

ज्याचे उदाहरण देऊन भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्यात आले.त्याच युरोपमध्ये आज पुन्हा रेल्वेचे राष्ट्रीयीकरण सुरू आहे. त्यामुळे खासगीकरण कितपत योग्य आहे? हा खरा प्रश्न आहे. आधी 27 ते 28 लाख कर्मचारी रेल्वेत होते, ती संख्या आज 11 सव्वा अकरा लाखांवर आली आहे. परंतु प्रवाशांचा भरणा वाढत चालले आहे, रेल्वेचा महसुलही वाढला आहे. रेल्वे आस्थापनेवरील माणसे कमी करत चालली आहे आणि दुसरीकडे रेल्वेने चांगली सुविधा द्यावी ही अपेक्षा वाढत आहे. एकीकडे नोकर भरती करत नाहीत, आस्थापनाची माणसे निवृत्त झाल्यावर भरती करी नाही. लोकसंख्या वाढत चालली आहे, प्रवाशांवर ताण, यंत्रणेवर ताण पडत चालला आहे आणि सर्व्हिस चांगली नाही म्हणून खासगीकरण करा असा दुटप्पी धोरण सर्वांसाठी घातक असल्याचे मतही महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केले.

भारत सरकारच्या संपत्तीचे संरक्षण केले पाहीजे. गेल्या 4-5 वर्षांत नफ्यात असणाऱ्या संस्था विकण्याचा सपाटा नरेंद्र मोदी सरकारने लावला आहे. किमान रेल्वे ज्याला मिनी भारत म्हणतो, सर्वात मोठी पीएसयु आहे त्याबाबतीत आपण दक्ष राहिले पाहीजे अशी अपेक्षाही महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा