Home ठळक बातम्या 8 दिवसांत खड्डे भरा नाही तर अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात टाकू – शिवसेना शहरप्रमुख...

8 दिवसांत खड्डे भरा नाही तर अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात टाकू – शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील

किल्ले दुर्गाडी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरप्रमुख रवी पाटील यांच्याकडून पाहणी

कल्याण दि.1 ऑक्टोबर :
गणपती उलटून आता नवरात्रौत्सव तोंडावर आला तरी कल्याण डोंबिवलीतील
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील खड्डे अद्यापही भरले गेलेले नाहीयेत. यावरून केडीएमसीवर टिकेचा भडिमार सुरू असताना आता सत्ताधारी शिवसेना गटही याप्रश्नी आक्रमक झाला आहे. येत्या आठ दिवसांत खड्डे भरले नाहीत तर अधिकाऱ्यालाच खड्ड्यामध्ये टाकण्याचा इशारा शहरप्रमूख रवी पाटील यांनी दिला आहे. आगामी नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील कामाची पाहणी केली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना हा इशारा दिला. (If the potholes are not filled in 8 days, we will throw the officers into the pothole – Shiv Sena City Chief Ravi Patil)

कल्याण पश्चिमेच्या ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर नवरात्रीत दुर्गामातेच्या दर्शनासाठी लाखो भक्त येत असतात. यंदाच्या महिन्यात १५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान किल्ले दुर्गाडीवर नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सोयी सुविधा, बुरुजाचे पहिल्या टप्य्यातील काम आणि दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया आदींसंदर्भात आम्ही एक महिन्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. दुर्गाडीवर नवरात्रौत्सवात लाखो येतात. हा धार्मिक उत्सव असून यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. बुरुजावर गर्दीमुळे ताण येऊ नये, उत्सव सुरळित पार पडवा. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरु असल्याची माहिती शहरप्रमूख रवी पाटील यांनी दिली. तसेच हा उत्सव मोठ्या जल्लोषात, धामधुमीत साजरा करण्यात येणार असून नवरात्री दरम्यान दुर्गाडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

तर अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात टाकणार…

कल्याण डोंबिवलीमध्ये विविध रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून गणेशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्यात येथील असा दावा पालिका आयुक्तांकडून करण्यात आला होता. मात्र आयुक्तांच्या या आदेशांना ठेकेदारांनी केराची टोपली दाखवल्याने कल्याण डोंबिवलीतील खड्डे जसेच्या तसे आहेत. तर येत्या 15 दिवसात नवरात्रौत्सव साजरा होणार असून 8 दिवसात खड्डे भरले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात टाकण्याचा इशारा रवी पाटील यांनी यावेळी दिला. तसेच ठेकेदारांचे एक रुपयाचेही बिल काढले तर त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मागणी करणार असल्याचेही शहरप्रमुख रवी पाटील यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा