Home ठळक बातम्या केडीएमटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी पगारासोबत मिळणार – रवी पाटील यांची माहिती

केडीएमटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी पगारासोबत मिळणार – रवी पाटील यांची माहिती

परिवहनच्या विविध मुद्द्यांवर केडीएमसी आयुक्तांसोबत झाली बैठक

कल्याण दि.12 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन म्हणजेच केडीएमटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी पगारातून देण्याला केडीएमसी आयुक्तांनी मान्य केल्याची माहिती परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे.
केडीएमटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आज महापालिका मुख्यालयात बैठक झाली. त्यामध्ये महत्वाच्या प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली.

ज्यामध्ये वेतन आयोग थकबाकी, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवा निवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांची थकीत देणी, परिवहन कर्मचाऱ्यांना महापालिकेत विलीन करणे, अनुकंपा तत्वावरील वारसांना महापालिका सेवेत घेणे, परिवहन सेवा आणि महापालिकेचे एकत्रित अंदाजपत्रक बनवणे आदी महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.

त्यापैकी 6-7 व्या वेतन आयोगातील थकीत रक्कम तीन महिन्याच्या कालावधीत तांत्रिक अडचणी दूर केल्या जाणार आहेत. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीपोटी दर महिन्याला 1 कोटी रुपये देण्याला आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मान्य केल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान थकीत रक्कम मिळणार असल्याने केडीएमटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून अध्यक्ष रवी पाटील आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा