Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत सव्वाचार लाख लोकांनी घेतलाय 1ला डोस; तर दिड लाख...

कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत सव्वाचार लाख लोकांनी घेतलाय 1ला डोस; तर दिड लाख जणांचे झालेत दोन्ही डोस

 

कल्याण – डोंबिवली दि.10 ऑगस्ट :
एकीकडे शासनाने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाच गेल्या 8 महिन्यांमध्ये कल्याण डोंबिवली क्षेत्रात सुमारे 4 लाख 26 हजार नागरिकांचा पहिला तर 1 लाख 52 हजार नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

साधारणपणे जानेवारी महिन्यात कल्याण डोंबिवली क्षेत्रातील लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला हेल्थ लाईन वर्कर, फ्रंट लाईन वर्करसह ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. मात्र टप्प्याटप्प्याने त्यात बदल होऊन आता 18 वर्षांवरील सर्वाचेच लसीकरण केले जात आहे. आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमार्फत हेल्थ वर्कर, फ्रंन्टलाईन वर्कर तसेच 18 वर्षांवरील 3 लाख 98 हजार जणांचे लसीकरण झाले आहे. तर महापालिकेने गेल्या महिन्यात झोपड्पट्टी-चाळ परिसरात सुरु केलेल्या” Near To Home” म्हणजेच मोबाईल व्हॅन उपक्रमात 38 हजार 482 जणांचे लसीकरण झालेले आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयामार्फत केल्या जाणा-या लसीकरण प्रक्रीयेमध्ये 1 लाख 41 हजार 490 इतके लसीकरण झाले आहे. तर केडीएमसी क्षेत्रात आत्तापर्यंत 5 लाख 78 हजार जणांचे लसीकरण झाले असून त्यामध्ये सुमारे 4 लाख 26 हजार नागरिकांचा पहिला तर 1 लाख 52 हजार नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

दरम्यान आतापर्यंत झालेल्या लसीकरणाचा विचार करता कल्याण डोंबिवलीमध्ये अद्याप मोठया लोकसंख्येचे लसीकरण बाकी आहे. ते लवकरात लवकर होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची नितांत गरज आहे. अन्यथा स्लॉट बुक होण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा