Home ठळक बातम्या केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्याकडून कल्याणातील मतदान केंद्रांची पाहणी

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्याकडून कल्याणातील मतदान केंद्रांची पाहणी

कल्याण दि.19.मे :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या सोमवारी २० मे रोजी होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी आज कल्याणातील जाईबाई शाळा, मॉडर्न कॉलेज, राजभर शाळा परिसरातील इतर मतदान केंद्रांवरील व्यवस्थेबाबत पाहणी केली.(Inspection of polling stations in Kalyan by KDMC Commissioner Dr. Indu Rani Jakhar)

मतदान केंद्रात प्रामुख्याने मतदान अधिकारी, कर्मचारी तसेच मतदारांसाठी स्वच्छ शौचालयांची व्यवस्था, त्याचप्रमाणे उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदान केंद्रात वायु वीजनाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, मंडप व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची तसेच व्हीलचेअरची व्यवस्था योग्यरीतीने असल्याबाबत तसेच मतदान केंद्राभोवतालचा परिसर स्वच्छ असल्याबाबत केडीएमसी आयुक्त डॉ. जाखड यांनी पाहणी करत मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रे सुसज्य असल्याची आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी खातरजमा केली.

महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांनी उद्या म्हणजे दिनांक 20 मे रोजी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी यावेळी केले.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त धैर्यशील जाधव, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, ५/ड प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा