Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीचा पारा १० अंशांवर : मौसमातील निच्चांकी तापमानाची नोंद

कल्याण डोंबिवलीचा पारा १० अंशांवर : मौसमातील निच्चांकी तापमानाची नोंद

बदलापूरमध्ये सर्वात कमी ८ .८ अंश सेल्सिअस तापमान

कल्याण – डोंबिवली दि.१५ जानेवारी :
हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. कल्याण डोंबिवलीकरांची आजची सकाळ ही चांगलीच गारेगार ठरली असून आज सकाळी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कल्याणात तब्बल १०.७ अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत ११.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. (Kalyan Dombivli mercury at 10 degrees : Season’s lowest temperature recorded)

उत्तरेकडील भागात आलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे (western disturbances) आपल्याकडील वाऱ्याची दिशा बदलून पुन्हा उत्तर – पश्चिम झाली आहे. परिणामी आजच्या मकर संक्रांतीच्या आसपास तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यासोबतच हे पश्चिमी विक्षोभ (Western Disturbances) पुढे सरकल्याने उत्तर भारतातून येणारी हवा आपल्याकडेही पोहोचण्याच्या शक्यतेमुळे ही थंडीची लाट येईल असेही हवामान अभ्यासकांनी सांगितले होते.

त्यानुसार आता तापमानात लक्षणीय बदल दिसत असून कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर पर्यंतच्या पट्ट्यात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

विविध शहरांतील आजचे किमान तापमान

कल्याण १०.७

डोंबिवली ११.५

बदलापूर ८.८

ठाणे १३

नवी मुंबई १३.४

मुंबई १३.८

कर्जत ९

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा