Home क्राइम वॉच 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येने हादरले कल्याण पश्चिम

70 वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येने हादरले कल्याण पश्चिम

कल्याण दि.28 फेब्रुवारी :
घरामध्ये एकटीच राहणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याच्या प्रकाराने कल्याण पश्चिम हादरून गेले आहे. कल्याण पश्चिमेच्या दत्तआळी परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

कल्याण पश्चिमेकडील दत्तआळी परिसरात 70 वर्षीय हंसाबाई ठक्कर या घरामध्ये एकट्याच राहत होत्या. अनेक वेळा संपर्क करूनही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामूळे नातेवाईकानी घरी येऊन पाहिलं असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाजारपेठ पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आणि कोणी केली याची उत्तरं पोलीस तपासातच मिळू शकतील.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा