दोघा विद्यार्थ्यांनी मिळवले 98 टक्के गुण
कल्याण दि.29 मे :
कल्याणच्या शिक्षण क्षेत्रातील दिग्गज नाव असलेल्या पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या पोटे ट्युटोरियलने यावर्षीही घवघवीत यशाची आपली परंपरा कायम ठेवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत पोटे ट्युटोरियलचा 100 टक्के निकाल लागला असून दोन विद्यार्थी तब्बल 98 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.(Kalyana Pote Tutorial’s legacy of success continues; 100 percent result of 10th class this year too)
पुस्तकी ज्ञानासह सध्याच्या काळात भविष्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रॅक्टिकल शिक्षणासाठी पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक आहे. या ग्रुपमार्फत गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून म्हणजेच 21 वर्षांपासून पोटे ट्युटोरियलमार्फत विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसची सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तर सुरुवातीपासून पोटे ट्युटोरियलने दहावीच्या परीक्षेतील आपल्या 100 टक्के निकालाची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम राखली आहे. यंदा पोटे ट्युटोरियलच्या दोघा विद्यार्थ्यांनी 98 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. 64 हून अधिक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर 80 टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 134 पेक्षा जास्त आहे.
या सातत्यपूर्ण घवघवीत यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांसह पोटे ट्युटोरियल आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.