Home ठळक बातम्या देखभाल दुरुस्ती – पाणीगळती : या भागांमध्ये येत्या गुरूवारी (30 मे 2024)...

देखभाल दुरुस्ती – पाणीगळती : या भागांमध्ये येत्या गुरूवारी (30 मे 2024) पाणी नाही

कल्याण दि.28 मे :
देखभाल दुरुस्ती तसेच पाईप लाईनवरील पाणी गळती थांबवण्यासाठी येत्या गुरुवारी 30 मे 2024 रोजी टिटवाळा आणि आजूबाजूच्या गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. केडीएमसीच्या पाणी पुरवठा कल्याण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे.(MAINTENANCE REPAIRS – WATER LEAKAGE : These areas will not have water next Thursday 30 May 2024)

केडीएमसीच्या 100 दश लक्ष लिटर मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत – यांत्रिक उपकरणांची देखभाल दुरुस्ती आणि वडवली – मांडा टिटवाळा परिसरातील वितरण वाहिनीवरील पाणी गळती थांबवण्याचे काम केले जाणार आहे.

त्यामुळे येत्या गुरुवारी 30 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोहीली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण ग्रामीण विभागाला होणाऱ्या पुढील भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या भागांमध्ये गुरुवारी (30 मे 2024) पाणी नाही…
टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी यांच्यासह कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावांमध्ये येत्या गुरुवारी पाणी नसेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा