Home क्राइम वॉच केडीएमसीच्या सुरक्षा रक्षक अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

केडीएमसीच्या सुरक्षा रक्षक अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

कल्याण दि.२१ जानेवारी :

कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या सहाय्यक सुरक्षा रक्षक अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. कंत्राटी सुरक्षा रक्षकांची ड्युटी लावण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने ही कारवाई केली आहे.(KDMC security officer caught red-handed while accepting bribe)

भरत बुळे असे या अधिकाऱ्याचे नाव असून केडीएमसीच्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदी ते कार्यरत आहेत. केडीएमसी सुरक्षा विभागामध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांना त्यांच्याकडून ड्युटी देण्याचे काम केले जाते. त्यानुसार हवी त्याठिकाणी ड्युटी लावण्यासाठी दोन सुरक्षा रक्षकांकडे त्यांनी दर महिन्याला ठराविक रकमेची मागणी केली होती. त्यावर संबंधित कंत्राटी सुरक्षा रक्षकाने ठाणे अँटी करप्शनकडे त्याबाबत तक्रार केली होती.

त्याची खातरजमा करून अँटी करप्शनकडून आज सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार ही एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना भरत बूळेला रंगेहाथ पकडण्यात आले.

दरम्यान केडीएमसी आणि अँटी करप्शन विभाग यांचे फारच जुने आणि घनिष्ट नाते आहे. गेल्या दोन अडीच वर्षांचा कालावधी वगळता दोन दशकांत केडीएमसीच्या वेगवेगळ्या विभागातील तब्बल ३८ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा