Home ठळक बातम्या शिवसेनेने भाजपला धोका दिला; महाआघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही – भाजप...

शिवसेनेने भाजपला धोका दिला; महाआघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही – भाजप महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी

 

कल्याण दि.26 सप्टेंबर :
एकीकडे शिवसेना नेत्यांच्या विधानांमूळे पुनः एकदा शिवसेना – भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच राज्यातील महाआघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे विधान भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी यांनी कल्याणात केले आहे. भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी ते आज कल्याणात आले होते. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.

काँग्रेसचा ,राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली. त्यामध्ये लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या बाजूने कौल दिला. मात्र तरीही शिवसेनेने भाजपला धोका देत काँग्रेस ,राष्ट्रवादीच्या साथीने महाविकास आघाडी सरकार बनवत मतदारांना धोका दिला आहे. हे सरकार किती दिवस टिकते हे आम्ही पण पाहत असून जास्त दिवस टिकेल असे वाटत नसल्याचेही रवी यांनी स्पष्ट केले.
तर राज्यात आपण जिकडे जिकडे फिरतोय तिकडे महाविकास आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्याचे दिसत असून लोकशाहीत जनता या देशाची न्यायाधीश आहे. येत्या काळात तेच यावर फैसला घेतील असे सूचक वक्तव्यही सी.टी. रवी यांनी यावेळी केले.

मागील लेखकल्याणजवळील मलंगगड भागातून नामांकित कंपन्यांचे गोवा मेड 50 लाखांचे मद्य हस्तगत
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा