Home कोरोना शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलीचा जंगी विवाह सोहळा; कोवीडचे नियम केवळ सामान्यांसाठीच असल्याचे स्पष्ट

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलीचा जंगी विवाह सोहळा; कोवीडचे नियम केवळ सामान्यांसाठीच असल्याचे स्पष्ट

 

कल्याण दि.4 एप्रिल :
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वानाच जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिलाय खरा मात्र त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेवकाकडून या सल्ल्याला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे कल्याणात समोर आले आहे. कल्याणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने आपल्या मुलीच्या लग्नाचा शाही विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यामुळे कोवीडचे नियम हे केवळ सामान्यांसाठीच असून राजकीय पुढाऱ्यांना त्यातून सूट असल्याचेच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ( marriage ceremony of Shiv Sena office bearer’s daughter; covid’s rules are for the common man only)

कल्याण पश्चिमेतील ओपन लॉनवर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता, तर सोशल डिस्टन्सचेही कोणते पालन होत नव्हते. विशेष म्हणजे या जंगी विवाह सोहळ्याला अनेक राजकीय पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे कल्याण डोंबिवलीत वाढत्या रुग्णसंख्येने कळस गाठलेला असताना पालिकेतर्फे विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढता कोरोना पाहता लोकांनी जबाबदारपणे वागण्याचे नुकतेच आवाहन केले आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागत असतील तर मग त्याबाबत काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच सामान्य नागरिकांवर कोवीड नियमांचा बडगा उगारणारे महापालिका आणि पोलीस अधिकारी आता याबाबत काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा