Home ठळक बातम्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे : कल्याण डोंबिवलीचे “इन्फ्रास्ट्रक्चर मॅन”

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे : कल्याण डोंबिवलीचे “इन्फ्रास्ट्रक्चर मॅन”

पायाभूत सुविधांच्या वेगवान प्रवासाचे शिल्पकार

कल्याण दि. ३ फेब्रूवारी :
कल्याण आणि डोंबिवली. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभूनही राजकीयदृष्ट्या मात्र शापित असणारी गलिच्छ आणि घाणेरडी शहरे, कल्याण डोंबिवली म्हणजे एखाद्या खेडेगावालाही लाजवेल अशी बजबजपुरी. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत या शहरांची अशीच नकारात्मक ओळख होती. विशेषतः इथल्या पायाभूत सुविधांच्या नावाने बोलायचे झाले तर अक्षरशः बोंबच. कोणाला झाकावं आणि कोणाला काढावं अशी डोकं सुन्न करणारी परिस्थिती. मात्र गेल्या दशकभरापेक्षा कमी कालावधीत या शहरांच्या पायाभूत सुविधांबाबत घेतलेल्या आणि प्रत्यक्षात राबवण्यात आलेल्या निर्णयांमुळे, आता या दोन्ही शहरांचा जणू काही मेकओव्हर सुरू झालाय. या शहरांच्या किंवा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेपासून आजतागायत कधीही निर्माण न झालेल्या पायाभूत सुविधा आज एक एक करून प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. ज्यामुळे सर्वच बाबतीत मागे पडलेली ही शहरे आता विकासाच्या स्पर्धेत आणली गेली आहेत. आपल्या शहरांच्या या सर्व सकारात्मक बदलांना निमित्त आणि कारण आहे ती एकमेव व्यक्ती, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे. (mp-dr-srikant-shinde-kalyan-dombivlis-infrastructure-man)

गोल्डन ट्रँगलच्या केंद्रस्थानी असूनही विकास नाहीच…
एकीकडे अवघ्या एक दिड तासाच्या अंतरावर असणारी आर्थिक राजधानी मुंबई, चार तासांच्या अंतरावर असणारी सांस्कृतिक राजधानी पुणे आणि तिसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे नाशिक शहर. राज्यातील विकासाचा गोल्डन ट्रँगल ( सुवर्ण त्रिकोण) अशी ओळख असणाऱ्या या तीन महत्वपूर्ण शहरांच्या केंद्रस्थानी कल्याण आणि डोंबिवली ही शहरे. ही अत्यंत महत्वपूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहता कल्याण डोंबिवलीचा विकास यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र इतके मोठे भौगोलिक महत्व लाभूनही राजकीय इच्छाशक्तीअभावी ही शहरे विकासापासून वंचितच राहिली.

आणि २०१४ नंतर वेगळा अध्याय सुरू…
आजचा विचार केला असता असे जाणवेल की २०१४ ची लोकसभा निवडणूक ही ज्याप्रकारे संपूर्ण देशाचे भवितव्य बदलणारी ठरली. अगदी त्याचप्रमाणे कल्याण आणि डोंबिवलीबाबतही या निवडणुकीनंतर एक वेगळा अध्याय लिहिण्यास सुरुवात झाली. राजकारणाचा कोणताही गंध नसलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे या तरुणाला, मतदारांनी विश्वास दाखवत विजयी केले. आणि मग लोकांनी दाखवलेल्या या विश्वासाला अधिकाधिक न्याय देण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्मपासून सुरू केले आहे जे आजतागायत कायम आहे.

कल्याण डोंबिवलीला हक्काचा आवाज मिळाला…
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने कल्याण डोंबिवलीला एक हक्काचा माणूस आणि एक हक्काचा आवाज मिळाला. खासदार झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ त्यांनी आपल्या पदासह कल्याण डोंबिवलीचा अभ्यास करण्यात घालवला. आणि मग कामाला अशी काही सुरुवात केली की ज्यामुळे मतदारसंघासोबतच देशाचे सर्वोच्च स्थान असणाऱ्या लोकसभेतही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे नावाचे नाणे खणखणीत वाजू लागले. आपल्या संयमी, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद शैलीत त्यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न संसदेमध्ये केवळ मांडलेच नाही तर ते अतिशय कमी वेळात तडीसही नेले.

तोकड्या पायाभूत सुविधा त्यात इतर शहरांचा बोजा…
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीची सर्वात पहिली आणि महत्वाची गरज ओळखली. ती म्हणजे दळण वळणासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव. याठिकाणी सध्या अस्तित्वात असणारे रस्ते – उड्डाणपूल यांची क्षमता केव्हाच संपून गेली होती. त्यातच शेजारील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिक मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुण्याला जाण्यासाठीही कल्याण डोंबिवलीतूनच जात येत असल्याने वाहतूक समस्येने तर आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते.

…आणि कल्याण डोंबिवलीचा कायापालट झाला सुरू
कल्याण डोंबिवलीतील नेमकी समस्या आणि त्यासाठी आवश्यक असणारी गरज लक्षात आल्यानंतर मग खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या समस्येच्या थेट मुळालाच हात घातला. आणि एकापाठोपाठ एक शहराच्या अंतर्गत आणि बाह्य भागांत असे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यास सुरुवात केली. ज्यानुसार शहरांतर्गत असलेल्या डांबरी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण – रुंदीकरणाचे तर शहराच्या बाह्य भागांत नव्या उड्डाणपुलांची, नव्या रस्त्यांच्या निर्मितीचे काम अतिशय मोठ्या स्तरावर हाती घेण्यात आले. गेल्या काही वर्षांत कल्याण शीळ रोड रुंदीकरण आणि काँक्रिटिकरण, नविन पत्रीपुल, दुर्गाडी पुल आदी अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्णही झाले आहेत. तर महत्वाकांक्षी काटई – एरोली फ्री वे, माणकोली पुल, रिंगरोडसारखे इतर प्रकल्प अंतिम टप्प्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवली परिसरात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ३ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची पायाभूत सुविधांची पेरणी केली जात आहे.

मेट्रो प्रकल्प ठरणार कल्याण डोंबिवलीकरांसाठी गेम चेंजर…
तर एकीकडे पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात असताना मेट्रो प्रकल्पांमुळे तर कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांचा वेगाने विकास होण्यास मदत होणार आहे. कल्याण – तळोजा आणि भिवंडी – कल्याण हे दोन वेगवेगळे मेट्रो प्रकल्प कल्याण डोंबिवलीसाठी निश्चितच गेमचेंजर ठरतील यात शंकाच नाही. त्यापैकी कल्याण – तळोजा या मेट्रो १२ प्रकल्पाची सुमारे ६ हजार कोटींची निविदाही नुकतीच प्रसिद्ध झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होत आहे. त्याच्यासाठीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेला पाठपुरावा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

अनस्टॉपेबल, अनबिटेबल आणि अनटचेबल इन्फ्रास्ट्रक्चर मॅन…
वय वर्षे अवघे ३७, त्यातच खासदारकीची दुसरी टर्म आणि तीदेखील अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. मात्र अवघ्या काही वर्षांच्या या कार्यकाळात त्यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला तर त्यांचा थक्क करणारा असा हा प्रवास आहे. वैयक्तीक हेव्या दाव्याच्या राजकारणापेक्षा नेहमीच विकासात्मक भूमिका घेत त्यांनी वेळोवेळी आपल्या राजकारणाची दिशा आणि मार्ग इतरांपेक्षा वेगळाच असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. त्यामूळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे ३ शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ते ‘आपल्या मार्गात येणाऱ्या गतिरोधकांसाठी – अनस्टॉपेबल, आपल्या विरोधकांसाठी- अनबिटेबल आणि नकारात्मक राजकारणासाठी – अनटचेबल’ यापेक्षा वेगळे काही होऊ शकणार नाही.

“आता ही तर फक्त एक सुरुवात आहे…

अजिंक्य आसमंताची तुम्हालाच साद आहे…

उधळू दे चौफेर वारू, व्यापू दे या दशदिशा…

कार्यकर्तृत्वाच्या या नभाला अथक प्रयत्नांची साथ आहे.”

 

©️- केतन बेटावदकर

2 कॉमेंट्स

  1. What about ulhasnagar still jeans karkhana running unethically…
    Nobody support if anyone ask or talk on same issue he got threat calls. Nobody wants ulhasnagar should get developed… Residents areas are converting in commercial.. Can Mr. Shrikant shinde sir will take care about the same… We are also in trouble about basic issue like water, medical best hospital, road, electricity but we can manage this but this jeans karkhana is horrible issue… Pls look into the same

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा