Home ठळक बातम्या कल्याण शीळ मार्गावरील वाहतुकीत रात्रीच्या वेळेत बदल; नव्या खाडी उड्डाणपुलावर 7 गर्डर...

कल्याण शीळ मार्गावरील वाहतुकीत रात्रीच्या वेळेत बदल; नव्या खाडी उड्डाणपुलावर 7 गर्डर ठेवण्याचे काम

कल्याण डोंबिवली दि.20 मार्च :
कल्याण शीळ मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. कल्याण शीळ मार्गावरील वाहतुकीत 22 मार्चपर्यंत रात्रीच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. देसाई खाडी ते काटई गाव येथे नव्या उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून याठिकाणी 7 भले मोठे गर्डर टाकण्यासाठी इथल्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती ठाणे ट्रॅफिक डीसीपी डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

कल्याण फाटा / शीळ फाट्याकडून कल्याणकडे येणाऱ्या मार्गावर देसाई खाडी परिसरातील नव्या उड्डाणपुलाचे हे गर्डर टाकण्यात येणार आहेत. मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हे गर्डर टाकण्यात येणार असून त्यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पुढील दोन दिवस म्हणजेच 20, 21 आणि 22 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.


असे आहेत हे बदल…


प्रवेश बंद – १

मुंब्रा, कल्याण फाट्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग…
ही वाहने कल्याण फाटा- मुंब्रा बायपास – खारेगाव टोलनाकामार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील .

प्रवेश बंद -2
कल्याणकडून कल्याण फाटा / शीळ फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना काटई चौक (बदलापूर चौक) येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग
या मार्गाऐवजी ही वाहने काटई चौक (बदलापूर चौक) – खोणी नाका- तळोजा एमआयडीसीमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.

ही वाहतूक अधिसूचना खालील वेळेमध्ये गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.

) दि. २०/०३/२०२४ रोजी रात्री 11 वाजल्यापासून दि. २१/०३/२०२४ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत

३) दि. २१/०३/२०२४ रोजी रात्रौ 11 वाजल्यापासून ते दि. २२/०३/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत

४) दि. २२/०३/२०२४ रोजी रात्री 1 वाजल्यापासून ते दि. २३/०३/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत

तसेच ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नसल्याचेही वाहतूक पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा