Home ठळक बातम्या रेल्वेमध्ये फेरीवाल्यांना परवानगी नको ; आमदार राजू पाटील यांची मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे...

रेल्वेमध्ये फेरीवाल्यांना परवानगी नको ; आमदार राजू पाटील यांची मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी

 

कल्याण ग्रामीण दि .28 नोव्हेंबर :
उपनगरीय रेल्वेत फेरीवाल्यांना परवानगी दिल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असल्याने लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील केली आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान प्रवेश करण्यापासून उतरण्यापर्यत मोठा संघर्ष करावा लागतो. त्यातच फेरीवाल्यांना प्रवेश दिल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच सद्यपरिस्थितीत प्रवाशांनी रेल्वेकडे अनधिकृत फेरीवाल्यांच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्याचे सांगत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार आहे. त्यामुळे रेल्वेने अनधिकृत फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घेण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लोकल वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता होण्याआधीच रेल्वेत अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश देऊन रेल्वे प्रशासन प्रवाशांना मनस्ताप देण्याच्या विचारात असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची भूमिका आमदार राजू पाटील यांनी मांडली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा