Home ठळक बातम्या आता पिंपरी-चिंचवडही राबवणार केडीएमसीची ‘शून्य कचरा’ मोहीम

आता पिंपरी-चिंचवडही राबवणार केडीएमसीची ‘शून्य कचरा’ मोहीम

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांनी केली केडीएमसीच्या प्रकल्पांची पाहणी

कल्याण दि.9 जुलै :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ‘शुन्य कचरा मोहीम’ राबवून आधारवाडी डंम्पीग ग्राऊंड बंद केले आहे. केडीएमसीच्या या महत्वाकांक्षी मोहीमेची दखल आता राज्यातील इतर महापालिकांनीही घेत त्याचे अनुकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील एक प्रमूख महापालिका असणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेने आता केडीएमसीच्या पाऊलावर पाऊल ठेवत तिकडे ही ‘शुन्य कचरा मोहीम’ राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.

राज्‍यातील15 महापालिका आयुक्तांसमोर डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून शुन्य कचरा (Zero Garbage Mission ) मोहिमेबाबत सादरीकरण

महापालिकेच्या शुन्य कचरा (Zero Garbage Mission ) मोहिमेच्या अनुषंगाने राज्याच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी राज्‍यातील15 महापालिका आयुक्तांसमोर, केडीएमसी आयुक्त महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुन्य कचरा (Zero Garbage Mission ) मोहिमेबाबत सादरीकरण (Presentation) केले. हे सादरीकरण पाहून काही आयुक्तांनी महापालिकेच्या या कार्यप्रणालीची पाहणी करण्याची इच्छा दर्शविली. त्यानुसार काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, इतर स्थायी समिती सदस्य, पक्षनेता नामदेव ढाके, मनसे गटनेता सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आधारवाडी डंम्पींग ग्राऊंड, बारावे घनकचरा प्रकल्प तसेच विविध इमारतींमध्ये केल्या जाणा-या खत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली आणि महापालिकेत कच-याचे कशा प्रकारे वर्गिकरण केले जाते याची माहिती घेतली. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही अशाच पद्धतीने कचऱ्याचे नियोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

90 टक्के कचऱ्याचे वर्गिकरण

केडीएमसी क्षेत्रात ओल्या कच-यावर बारावे आणि उंबर्डे घनकचरा प्रकल्पात थेट प्रक्रिया केली जाते. यापूर्वी महापालिकेत फार कमी म्हणजेच सुमारे 2 टक्के इतक्या कमी प्रमाणात कच-याचे वर्गिकरण होत होते. परंतू आता शून्य कचरा मोहिमेंतर्गत जवळ जवळ 90 टक्के कचऱ्याचे वर्गिकरण केले जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ही शून्य कचरा मोहीम एक पथदर्शी प्रकल्प ठरत असून येत्या काळात इतर काही महापालिकांनीही केडीएमसीच्या या मोहीमेची त्यांच्याकडे अंमलबजावणी केल्यास नवल वाटू नये.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा