Home ठळक बातम्या पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीत सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीत सामाजिक उपक्रमांचे आयोजन

 

कल्याण – डोंबिवली दि.१३ जून :
पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गरजू विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी हे उपक्रम राबविण्यात आल्याचे दिसून आले.

युवासेनेचे महाराष्ट्र सहसचिव योगेश निमसे यांच्यातर्फे आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रामबाग परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात आले. येथील रामबाग प्रभाग क्रमांक ९ मध्ये आयोजित या उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. पावसाळा तोंडावर आला असताना राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने गरजू व्यक्तींनी योगेश निमसे यांचे आभार मानले.

तर कल्याण जिल्हा युवाअधिकारी दिपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांच्यातर्फे प्रभाग क्र. 29 मधील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजू विद्यार्थांनी गर्दी केली होती. हा उपक्रमही समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरल्याने उपस्थित मुलांच्या पालकांनी दिपेश आणि जयेश म्हात्रे यांचे आभार मानले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा