Home ठळक बातम्या ओबीसी आरक्षण; महाविकास आघाडी सरकारविरोधात कल्याणात भाजपची निदर्शने

ओबीसी आरक्षण; महाविकास आघाडी सरकारविरोधात कल्याणात भाजपची निदर्शने

कल्याण दि.3 जून :
सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणप्रश्नी बाजू मांडण्यात कमी पडल्याचे सांगत भाजपतर्फे आज कल्याणात महाविकास आघाडी विरोधात निदर्शने करण्यात आली. माजी आमदार आणि भाजप भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी पडल्याचा आरोप नरेंद्र पवार यांनी केला. आज असणाऱ्या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ही निदर्शने केल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा