Home ठळक बातम्या गोशाळांच्या मदतीसाठी कल्याणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

गोशाळांच्या मदतीसाठी कल्याणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 

कल्याण दि.4 एप्रिल :
ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या विविध गो शाळांच्या मदतीसाठी कल्याणात गौमाता चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेच्या चिकणघर येथील टर्फ ग्राऊंडवर हॅपी क्लबतर्फे ही क्रिकेट स्पर्धा होत असून यंदाचे दुसरे वर्ष आहे.

ठाणे जिल्ह्यात अनेक गोशाळा असून सामाजिक संस्थांमार्फत त्या चालवल्या जात आहेत. तर विविध व्यक्ती आणि सामाजिक संस्था या आपापल्या परीने गोशाळा चालवण्यासाठी मदत करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणातील हॅपी क्लबतर्फे सामाजिक जबबदारी म्हणून ही क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येते. मात्र कोवीडमूळे त्यात खंड पडला होता.

यंदाचे स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून त्यामध्ये कल्याण आणि आसपासच्या परिसरातील 12 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये 4 महिला आणि 8 पुरुष संघांचा समावेश असल्याची माहिती आयोजक अल्पेश जैन यांनी दिली. या सपर्धेतून जमा होणाऱ्या निधीतून गोशाळाना आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा