Home कोरोना कल्याण डोंबिवलीतही आढळले ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण; दोघांचा मृत्यू झाल्याची केडीएमसीची माहिती

कल्याण डोंबिवलीतही आढळले ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण; दोघांचा मृत्यू झाल्याची केडीएमसीची माहिती

 

कल्याण-डोंबिवली दि.11 मे :
सध्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेपुढे कोरोनापाठोपाठ आव्हान उभे करणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ (mucormycosis) आजाराचे कल्याण डोंबिवलीतही रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले असले तरी इतर कोवीड रुग्णांनी घाबरून न जाण्याचे आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही काळजीपूर्वक स्टिरॉइड्सचा वापर करण्याचे आवाहनही केडीएमसीने केले आहे. (Patients with ‘mucormycosis’ also found in Kalyan Dombivali; KDMC informed that both of them died)

बुरशीजन्य आजार असणाऱ्या या म्युकरमायकोसिसचे सध्या राज्यभरात रुग्ण आढळू लागले आहेत. आता कल्याण डोंबिवलीतही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या आजाराने शिरकाव केल्याचे या दोन्ही घटनांनावरून दिसून येत आहे. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात या आजाराच्या 6 रुग्णांवर उपचार सुरू असून 2 दिवसांत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली. मृत्यू झालेल्यामध्ये एक रुग्ण कल्याण डोंबिवली परिसरातील तर दुसरा कल्याण ग्रामीण परिसरातील असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले असले तरी नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये असे आवाहन डॉ. अश्विनी पाटील यांनी केले असून डॉक्टरांनीही स्टिरॉइड्सचा योग्य प्रमाणत वापर करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा