Home कोरोना कल्याणात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरू ;अँटीजन टेस्ट करून थेट कॉरंटाईन सेंटरला...

कल्याणात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरू ;अँटीजन टेस्ट करून थेट कॉरंटाईन सेंटरला रवानगी

 

कल्याण दि.16 मे :
केडीएमसी आयुक्तांनी दिलेल्या कडक लॉकडाऊनच्या निर्देशांनंतर आज सकाळी कल्याणात पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचे दिसून आले. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन टेस्ट करून त्यात पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची थेट पालिकेच्या कॉरंटाईन सेंटरला रवानगी केली जात होती.

कल्याण डोंबिवलीत नियंत्रणात येत चाललेली कोवीड परिस्थिती आणि 3 ऱ्या लाटेचा वर्तवलेला अंदाज. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काल पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत पुढील 15 दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानूसार आज कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. त्यानंतर या सर्वांची महाजन वाडी हॉलमध्ये अँटीजन टेस्ट केली जात आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांची थेट पालिकेच्या कॉरंटाईन सेंटरला रवानगी केली जात आहे. त्यामध्ये काही जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये आणि पालिका -पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी केले.

दरम्यान कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचे पालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांचे आणखी किती दिवस पालन होते ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा