Home ठळक बातम्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात डोंबिवलीत शिवसेनेची जोरदार निदर्शने

भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात डोंबिवलीत शिवसेनेची जोरदार निदर्शने

सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची केली मागणी

डोंबिवली दि.7 एप्रिल :
डोंबिवलीतील शिवसेना शहर शाखेतर्फे आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केलेली पाहायला मिळाली. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली लोकांकडून गोळा केलेल्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत डोंबिवलीत शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आले. (Shiv Sena protests in Dombivali against BJP leader Kirit Somaiya)

आयएनएस विक्रांत ही युद्धवाहू नौका भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2013 मध्ये निधी संकलन मोहीम राबवली. मात्र यामध्ये गोळा झालेल्या निधीमध्ये सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला. या पार्श्वभुमीवर डोंबिवली शिवसेना शहर शाखेतर्फे आज शहर शाखेबाहेर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली.

दरम्यान किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी शिवसेना शहर शाखेतर्फे करण्यात आली आणि यासंदर्भातील निवेदन पोलिसांना देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा