Home कोरोना केडीएमसी क्षेत्रातील कोवीड निर्बंध हटवा ; मनसे आमदार राजू पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे...

केडीएमसी क्षेत्रातील कोवीड निर्बंध हटवा ; मनसे आमदार राजू पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 

 

डोंबिवली दि.15 मार्च :
कोरोना आटोक्यात आल्याने राज्य शासनाने मुंबई शहर – उपनगर, पुणे- रायगडसह १४ जिल्ह्यातील निर्बंध ४ मार्चपासून शिथिल केले आहेत. त्याचधर्तीवर कोरोनाचा कमी झालेला आलेख लक्षात घेऊन कल्याण डोंबिवलीतील निर्बंध हटवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांची भेट घेतली आहे.

राज्य शासनाने ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून मुंबईसह अन्य जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. तेथील सामाजिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम, सभागृह किंवा मैदानाच्या १०० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारांना लावण्यात आलेले निबंधही हटविण्यात आले आहेत. हे निबंध शिथिल करताना कोवीड लसीकरण, पॉझिटिव्हीटी रेट, आयसीयूमधील ऑक्सिजन बेड आदी निकष लावण्यात आले आहेत. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा विचार करण्यात आला असला तरी या नियमांचा सर्वाधिक फटका ठाणे जिल्ह्याला बसला आहे.

त्यातही डोंबिवली, कल्याण शहरे मुंबई लगत असताना आणि या नियमात बसूनही इथले निर्बंध निबंध शिथिल करण्यात आले नसल्याकडे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या दोन्ही शहरांमध्ये लसीकरणही चांगल्या प्रमाणात झालेले आहे. वास्तविक डोंबिवलीला सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहराचा दर्जा असून दरवर्षी हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त याठिकाणी निघणारी शोभायात्रा संपूर्ण राज्यात चर्चिली जाते. सध्या कोवीडची संख्या अत्यल्प झाली असल्याने तब्बल 2 वर्षानंतर शोभायात्रा काढण्याच्या डोंबिवलीकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र निर्बंधांमूळे परवानगी नसल्याने डोंबिवलीकरांमध्ये नाराजी पसरल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचे नियम न लावता कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांना सवलत देण्याची आवश्यकता आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाही केडीएमसीकडे दुर्लक्ष होत असल्याचेही मनसे आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा