Home क्राइम वॉच महावितरणची धडक कारवाई : ९ आलिशान फार्महाऊसकडून ३० लाखांची वीजचोरी उघडकीस

महावितरणची धडक कारवाई : ९ आलिशान फार्महाऊसकडून ३० लाखांची वीजचोरी उघडकीस

कल्याण मंडल १ कार्यालयाच्या विशेष पथकाची कामगिरी

कल्याण दि.२७ मे :
महावितरणच्या मुरबाड उपविभागात विशेष पथकाने शोध मोहिम राबवत ९ फार्महाऊसकडून केली जाणारी ३० लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी पकडली आहे. या फार्महाऊस चालकांकडून विनामीटर थेट वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या विशेष पथकाला आढळून आले. (Strict action of Mahavitran: Power theft of 30 lakhs from 9 luxurious farmhouses)

३० लाखांहून अधिक किंमतीची ५२ हजार युनिट विजेची चोरी…
वीजचोऱ्या शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याण मंडल १ कार्यालयाच्या विशेष पथकाने मुरबाड उपविभागात २० फार्महाऊसच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. यापैकी ९ फार्महाऊसकडून तब्बल ३० लाख ४६ हजार रुपये किंमतीची ५२ हजार ४२९ युनिट विजेची चोरी आढळून आली आहे.

या गावात आहेत ही फार्महाऊस…
चिराड येथील १ रेसॉर्ट, ३ फार्महाऊस, मुरबाड , शिरावली येथील २ फार्महाऊस, गवाली आणि न्हावे गावातील प्रत्येकी १ अशा नऊ फार्महाऊसमध्ये विजेचा चोरटा वापर आढळून आला आहे.

तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल होणार…
चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे.

या पथकाने केली ही धडाकेबाज कारवाई…
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, सहायक अभियंते सुरज माकोडे, जयश्री कुरकुरे, दीपाली जावले, कर्मचारी किशोर राठोड, राजेंद्र जानकर, संतोष मलाये, विनोद गिलबिले, नितीन कुवर, आकाश गिरी, मधुकर चन्ने, सुभाष डोरे, संकेत मुर्तरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा