Home ठळक बातम्या जोरदार वाऱ्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या; कल्याणात 1 जण जखमी

जोरदार वाऱ्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या; कल्याणात 1 जण जखमी

कल्याण दि.17 मे :
कल्याणात जोरदार वाऱ्यामुळे स्लायडिंगच्या काचा फुटून एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेच्या पुण्योदय पार्क गृहसंकुलात हा धक्कादायक प्रकार घडला. (Strong winds shattered window panes; 1 injured in Kalyan)
सुरेश रामसिंह जव्हेरी, वय 55 वर्षे असे त्यांचे नाव आहे. सुरेश जव्हेरी हे आज सकाळी पूजा करत होते. त्यावेळी इतका जोरदार वारा आला आणि ते बसलेल्या खोलीतील खिडकीच्या सर्व काचा फुटल्या. त्यावेळी वाऱ्याच्या दाबाने काही काचा उडून या सुरेश जव्हेरी यांच्या शरीरात रुतल्या. या अपघातात त्यांच्या मांडीमध्ये जास्त काचा रुतल्या असून त्यांच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
दरम्यान या प्रकारानंतर असा प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा