Home ठळक बातम्या चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही; अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश

चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही; अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश

कल्याण दि.18 मे :
तौक्ते चक्रीवादळामूळे केवळ लोकांच्याच मालमत्तेचे नुकसान झाले नसून अनेक मुक्या प्राणी आणि पक्ष्यांनाही त्याचा फटका बसला आहे. कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी झाडं पडून अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला. तर या पक्ष्यांच्या इवल्याशा काही पिल्लांना जीवदान देण्यात पक्षीमित्र आणि त्यांच्या संस्थांना यश आले. (The hurricane also hit birds and animals; Many birds died and some were rescued)

चक्रीवादळामुळे गेल्या 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत वादळी वाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काल तर या वाऱ्यांनी सर्वानाच हादरवून सोडलेले पाहायला मिळाले. या वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने कल्याण डोंबिवलीत अनेक लहान आणि मोठी झाडं जमीनदोस्त झाली. त्यासोबतच या झाडांवर असणारी पक्षांची अनेक घरटीही मोडून पडल्याने त्यांची पिल्ले उघड्यावर पडली. तर काही पिल्लांचा पावसात भिजून मृत्यू झाल्याची माहिती वॉर संस्थेच्या सुहास पवार यांनी दिली. वॉर संस्थेसोबतच इकोड्राईव्ह यंगस्टर संस्थेचे महेश बनकर (09773430684), सेव्ह ट्रस्टचे सौरभ मूळे (09892444305) डीएलएडब्ल्यूचे विशाल कंथारिया (08286139684) यांच्याकडूनही अनेक पक्ष्यांना जीवदान देण्यात आले आहे.

या पिल्लांच्या पुनर्वसनाकरिता कल्याण डोंबिवलीतील पक्षीमित्र आणि सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. आतापर्यंत या संस्थेकडून 8 चिमणी, 3 कावळे, 16 कबूतर, 2खारूताई , 4 राखाडी बगळे, 1भारद्वाज पक्षी यांच्यावर उपचार करत सांभाळले जात आहे. त्याचबरोबर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली 2पोपट, 5 घारी आणि 7 घुबड या पक्ष्यांचीही देखभाल सुरू आहे.
कल्याणातील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. सिद्धी रायभोले आणि त्यांची टिम या सर्वांवर प्रथमोपचार करत आहेत.

वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशन
हेल्पलाईन नंबर  09869343435 / 07208349301

प्रमोद आहेर,     कल्याण (पश्चिम)    08080804276
रितेश लव्हाडे,   कल्याण (पुर्व)       09222512982
महेश मोरे,        डोंबिवली (पलावा) 09930390960
मनिष पिंपळे    डोंबिवली ( पश्चिम) 09987326273
निखिल कांबळे   टिटवाळा               09768161929
आकाश जाधव   आमणे सापे गाव     09921131891
किशोर बजागे     पडघा                   09657657100
कैलास पाटील     सरवली               08149929160
रोमेश यादव       आंबिवली              08355977789

मागील लेखजोरदार वाऱ्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या; कल्याणात 1 जण जखमी
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत 210 झाडं जमीनदोस्त; 13 घरांसह 8 गाड्यांचे नुकसान

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा