Home ठळक बातम्या कल्याणातील डॉक्टर दाम्पत्याच्या पोस्ट रिलॅक्सेशन व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

कल्याणातील डॉक्टर दाम्पत्याच्या पोस्ट रिलॅक्सेशन व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

 

कल्याण दि.14 जुलै :
कोवीड आल्यापासून त्याविरोधात लढताना डॉक्टर मंडळी प्रचंड ताण-तणावात वावरत आहेत. कोरोना काळात आलेलं हे दडपण आणि ताण दूर करण्यासाठी आता काही डॉक्टरांनी म्युजिक थेरपीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. कल्याणातील स्नेहांकूर रुग्णालयाचे डॉ. प्राजक्ता ठाकूर आणि डॉ. अभिजीत ठाकूर यांच्या अशाच एका व्हिडिओवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय.

कोरोना आल्यापासून डॉक्टरांना काळ वेळ विसरून काम करावं लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या परिस्थिती काहीशी सुधारलेली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका पूर्ण टळलेला नाहीये. अशा परिस्थितीत डॉक्टर आजही आपले रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. कल्याणातील या डॉक्टर ठाकूर दाम्पत्याने आपल्या रुग्णालयात एक शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर आलेला ताण आम्ही कसा दूर करतो, हे या डॉक्टरांनी आपल्या या व्हिडीओत दाखवून दिले आहे. यामध्ये ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर डॉ. अभिजित ठाकूर हे माऊथ ऑर्गन वाजवून आपला तसेच आपल्या सहकाऱ्यांचा ताण काहीसा कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला असून त्यावर लोकांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा