Home ठळक बातम्या उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाजपला भरलीय धडकी – माजी आमदार रुपेश म्हात्रे

उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भाजपला भरलीय धडकी – माजी आमदार रुपेश म्हात्रे

कल्याण पश्चिमेत झाला शिवगर्जना मेळावा

कल्याण दि. २ मार्च :
ज्या पद्धतीने आज राजकारण केलं जातय त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये भाजपविषयी प्रचंड चीड तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे. ज्यामुळे भाजपच्या उरामध्ये धडकी भरली असल्यानेच ते निवडणूक घेण्याची हिंमत करत नसल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी केला. भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये आज शिवगर्जना मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रुपेश म्हात्रे बोलत होते. (The response to Uddhav Thackeray has given BJP a shock – Former MLA Rupesh Mhatre)

कसब्याचा निकाल ही भविष्याची नांदी…

कसबा वधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र त्याठिकाणी आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेने निवडून दिले आहे. ही भविष्यातील राजकारणाची नांदी असल्याचे मतही संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केले. तर भाजप पक्ष हा पुतना मावशी असून ज्यांच्यासाठी आपण इतके इमाने इतबारे काम केले त्यांनीच आपल्याला संपवण्याचा प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडले मग काश्मिरात मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत जाऊन तुम्ही काय केले? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महिला पदाधिकाऱ्याचे वादग्रस्त विधान…
दरम्यान यावेळी उपस्थित मुंबईतील विभाग संघटक राजूल पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त असे विधान केले. राजुल पटेल यांनी या दोघांबद्दल शिवराळ भाषेचा वापर करत त्यांच्यावर टिका केल्याचे दिसून आले.

यावेळी उपनेते अल्ताफ शेख, जिल्हासंपर्क प्रमुख विजय साळवी, युवती सेनेच्या शीतल देवरूखकर – सेठ, विधानसभा क्षेत्र संघटक रविंद्र कपोते यांच्यासह दिलीप मालवणकर, तुषार राजे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आगामी काळात खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा