Home ठळक बातम्या कल्याणच्या या तरुणाने मिळवला ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचा मानाचा पुरस्कार

कल्याणच्या या तरुणाने मिळवला ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचा मानाचा पुरस्कार

 

कल्याण दि.3 फेब्रुवारी :
कल्याण शहरातील कासम शेख यांना जगविख्यात आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज अशा मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मानाचा असा एमव्हीपी (Most Valuable Professional in Artificial Intelligence (AzureAI) पुरस्कार प्राप्त झाला आहे. आयटी क्षेत्रात मानाचे स्थान असणारा हा पुरस्कार मिळवणारे कासम शेख हे भारतातील ५वे आणि महाराष्ट्र एकमेव व्यक्ती आहेत. तर जगभरात आतापर्यंत केवळ 142 व्यक्तींनाच आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. (This young man from Kalyan won the prestigious award of ‘Microsoft’ company )

कासम शेख हे कॅपजेमिनी या आयटी क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर सध्या कार्यरत असूननेते सामाजिक क्षेत्रामध्येही काम सुरू आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींसंदर्भात ते युवकांना बहुमूल्य असे मार्गदर्शनही करत असतात.

आर्टीफिशियल इंटेलिजन्समधील (Artificial Intelligence) आणि त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे क्लाऊड (cloud ) प्रोडक्टअसलेल्या AZURE टेक्नॉलॉजीची आज जगभरात चलती आहे. अनेक नवयुवक या अनोख्या टेक्नॉलॉजीकडे आकर्षित होत आहेत. अशातच महाराष्ट्रातील त्यातही कल्याणातील युवकाला असा प्रतिष्ठेचा अवार्ड मिळणे ही सर्व युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि अभिमानाची बाब आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा