Home ठळक बातम्या उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर – राणे यांना उमेदवारी जाहीर

उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर – राणे यांना उमेदवारी जाहीर

डोंबिवली दि.3 एप्रिल :
कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातील प्रतिस्पर्धी कोण ? याबाबतचा संभ्रम अखेर संपला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर – राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 2009 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. (Uddhav Thackeray announced the candidacy of Vaishali Darekar-Rane for Kalyan Lok Sabha)

गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभेतून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळते याबाबत बरीच उलट सुलट चर्चा सुरू होती. कधी युवानेते आदित्य ठाकरे तर कधी सुषमा अंधारे यांची नावं चर्चेत असताना गेल्याच आठवड्यात कै. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचे नाव पुढे आले होते. मात्र काही काळानंतर या नावांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आल्याने कल्याण लोकसभेत खासदार डॉ.शिंदे यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल याबाबत संभ्रम होता.

मुंबईतील मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी कल्याण लोकसभेसह हातकणांगले, पालघर आणि जळगाव या चार जागांसाठी उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान कल्याण लोकसभेसाठी नाव जाहीर झालेल्या वैशाली दरेकर – राणे यांनी 2009 मध्येही लोकसभेच्या आखाड्यात मनसेकडून आपले नशीब आजमावले होते. त्यावेळी त्यांना 1 लाखांहून अधिक मते मिळाली होती. आता पुन्हा एकदा दरेकर यांना उध्दव ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे. तर कल्याण लोकसभा ही नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली असून यावेळीही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशीच ते उभे राहणार मला खात्री असा विश्वास वैशाली दरेकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा