Home ठळक बातम्या केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी घेतली ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी घेतली ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

कल्याण दि.3 एप्रिल :
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी ही भेट घेण्यात आली.(Union Minister Kapil Patil met maharahstra bhushan Appasaheb Dharmadhikari)

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर कपिल पाटील हे समाजातील विविध प्रतिष्ठित आणि मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आज महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.

या वेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक सुमित पाटील, राम माळी आदींची उपस्थिती होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा