Home ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे योगाला जगमान्यता प्राप्त – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल...

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे योगाला जगमान्यता प्राप्त – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

कल्याणात झालेल्या योग दिनात 5 हजारांहून अधिक जणांची उपस्थिती

कल्याण दि. 21 जून :
आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग असणाऱ्या 5 हजार वर्षे जुन्या योगाला जगमान्यता प्राप्त झाल्याचे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणात व्यक्त केले. 14 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Yoga gained world recognition due to Prime Minister Narendra Modi – Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil)

जगाने स्वीकारलाय मोदींजींचा योगसंदेश…

योग केल्याने मन, मस्तिष्क आणि शारीरिक संतुलन राहण्यास मोठी मदत होते. हाच संदेश घेऊन 2015 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग आणि योग दिनाची मुहूर्तमेढ रोवली. आणि संपूर्ण जगाने हा योग संदेश स्विकारत त्याला अंगिकरण्यास सुरुवात केली आहे. तर ज्या नरेंद्र मोदींनी ही जागतिक योग दिनाची संकल्पना मांडली. ते आज अमेरिकेतून संपूर्ण जगाला संबोधित करीत होते हे आजच्या योगदिनाचे वैशिष्ट्य असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

वसुधैव कुटुंबकमचा याठिकाणी अनुभव…

वसुधैव कुटुंबकम हे आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे. संपूर्ण विश्व हेच आपलं घर आहे, याचा प्रत्यय याठिकाणी आपल्याला आला. ज्यामध्ये विशेष म्हणजे शाळकरी विद्यार्थी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि शासकीय अधिकारी अतिशय मोठ्या संख्येने सहभागी झाले ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख नरेंद्र पवार, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी आणि भाजप पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा