Home ठळक बातम्या कल्याण-डोंबिवलीकरांवरील ६०० रुपये करवाढ रद्द करा – खासदार कपिल पाटील यांची मागणी

कल्याण-डोंबिवलीकरांवरील ६०० रुपये करवाढ रद्द करा – खासदार कपिल पाटील यांची मागणी

कल्याण दि.29 मे:  
कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिकट असतानाच, कल्याण-डोंबिवली महापालिकेने आकारलेली घनकचरा व्यवस्थापनात शुल्कातील करवाढ अन्यायकारक असून या करवाढीला तातडीने स्थगिती देण्याची मागणी भाजप खासदार कपिल पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Cancel Rs 600 tax hike in Kalyan-Dombivali – Demand of MP Kapil Patil)

कोरोना आपत्तीच्या दुसऱ्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत असतानाच, महापालिकेने अचानकपणे घनकचरा व्यवस्थापन शुल्कात ६०० रुपयांची वाढ केली आहे. याबाबत नागरिकांना कोणतीही पूर्वसुचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे या दरवाढीने नागरिकांना नाहक भूर्दंड सहन करावा लागणार असल्याचे सांगत खासदार कपिल पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांचे लक्ष वेधले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून अद्याप अनेक सोसायट्या वा चाळींमधील कचरा उचलला जात नाही, अनेक ठिकाणी घंटागाडी पोहचत नाही, अशा परिस्थितीत घनकचरा व्यवस्थापन शुल्कात करण्यात आलेली वाढ चुकीची असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. त्यातच कोरोना आपत्तीमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या करवाढीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा