Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत या 18 ठिकाणी सुरू आहे कोवीड लसीकरण; 6 ठिकाणी विनामूल्य...

कल्याण डोंबिवलीत या 18 ठिकाणी सुरू आहे कोवीड लसीकरण; 6 ठिकाणी विनामूल्य तर 12 ठिकाणी सशुल्क

कल्याण-डोंबिवली दि.1 एप्रिल :

कल्याण डोंबिवलीतील वाढते कोरोना रुग्ण पाहता केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नविन केंद्र सुरू केली जात आहेत. कल्याण डोंबिवलीत सध्या 18 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जात असून त्यापैकी 6 शासकीय केंद्रांवर मोफत तर उर्वरित 12 खासगी ठिकाणी सशुल्क लसीकरण केले जात असल्याची माहिती पालिकेतर्फे एलएनएनला देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आजपासून (1 एप्रिल 2021) 45 वर्षे आणि त्यावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 आजारापासून बचावाकरीता लसीकरण करण्याची मोहिम सुरु झाली आहे. सध्यस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात 6 शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जात आहे. ज्यामध्ये “शास्त्रीनगर रुग्णालय” डोंबिवली प.”, “बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण प.,” “सावळाराम क्रिडा संकूल डोंबिवली पू.”, “विभागीय रेल्वे रुग्णालय कल्याण पू.”, “प्रबोधनकार ठाकरे शाळा, नेतिवली कल्याण पू.,” आणि “आर्ट गॅलरी लालचौकी कल्याण प.” या 6 शासकीय केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर पुढील 12 खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्कपणे (250 रुपये घेऊन) कोवीड लसीकरण केले जात असल्याचे एलएनएनला सांगण्यात आले. या 12 खाजगी रुग्णालयांमध्ये “बाज आर आर हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “एम्स रुग्णालय डोंबिवली पू.”, “श्री महागणपती हॉस्पीटल टिटवाळा पू.”, “इशा नेत्रालय कल्याण प.”, “स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण पू.”, “नोबेल हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “ऑप्टीलाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी ॲन्ड कार्डिएक केअर सेंटर कल्याण प.”, “एसआरव्ही ममता हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “होलीक्रॉस हॉस्पीटल कल्याण प.”, “श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण प.” आणि डॉ.सी.बी वैद्य मेमोरीयल हॉस्पीटल कल्याण प.” या 12 ठिकाणी प्रती डोस रुपये 250/- इतके शुल्क आकारुन ही लस घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

याठिकाणी 45 वर्षावरील नागरिकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक , आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी यांचेदेखील लसीकरण सुरू आहे. पात्र नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, आरोग्य सेतु अथवा Cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणासाठी यावे, मास्क तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केडीएमसी आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच पात्र नागरिकांना लवकरात लवकर कोविड लसीकरण सुविधांचा लाभ देण्यासाठी महानगर पालिकेमार्फत प्रयत्न केले जात असून लसीच्या उपलब्धतेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात टप्‍प्याटप्‍प्याने लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे.

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 6 आठवडयानंतर घेतल्यास अधिक परिणामकारक, रोगप्रतिकारक शक्ति प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीचा प्रथम डोस घेतलेल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अधिक परिणामकारक रोगप्रतिकारक क्षमता साधण्यासाठी या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस, प्रथम डोस प्राप्त केल्यानंतर 6 आठवडयानंतर घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा